राष्ट्रपती भवनात आढळला कोरोनाचा रुग्ण

2

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आले आहे. एखाद्या भागात कोरोनाचा एखादा रुग्ण आढळल्यास खबरदारी म्हणून संपूर्ण परिसरातील लोकांना इतरांपासून वेगळे, विलिगीकरणात ठेवणं आवश्यक असल्यामुळे इथे काम करणाऱ्या किमान १०० लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.

दरम्यान गेट क्रमांक ७० येथे राहणाऱ्या किमान १२५ कुटुंबांना घरीच क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे, अशीही माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहे, मंगळवार सकाळपर्यंत दिल्लीत हा आकडा २,५०० च्या आसपास पोहोचला होता. दिल्लीत  कंटेनमेंट झोनची संख्याही वाढवण्यात आली आहे ही संख्या ७९ वरुन ८४ करण्यात आली आहे.

कोरोनाने भारतात हाहाकार पसरवला आहे. येथे या विषाणूचा सामना करण्यासाठी दिलासा देणारी बातमी देताना सरकारने सोमवारी सांगितले की, आता देशात रुग्णांचे दुप्पट होण्याचे प्रमाण ७.५ दिवसांपर्यंत खाली आले आहे तसेच गेल्या पंधरवड्यात १५ जिल्ह्यांमधील कोरोना विषाणूचे एकही प्रकरण समोर आले नाही. दरम्यान, काही राज्यांनी अर्थव्यवस्थेचे नुकसान रोखण्यासाठी लॉकडाउनवरील काही बंधने शिथिल करण्याची घोषणा केली आहे, तर तामिळनाडू, कर्नाटकसह दिल्लीनेही ३ मेपर्यंत कोणतीही सवलत न देण्याचा निर्णय घेऊन कठोर निर्बंध सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन पाळला असतानाही कोरोनाचा जोर कमी होत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही फैलाव थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा