मुंबईत नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या

मुंबई, दि.१५ जून २०२० : मुंबईत शिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या मुलाने पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. अभिषेक श्रीकांत शेट्ये असं या २५ वर्षीय मुलाचं नाव आहे. रविवारी ( दि.१४) रोजी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

श्रीकांत शेट्ये हे चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग १५५ चे नगरसेवक आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत अभिषेक शेट्ये राहायचा. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपले होते. त्याचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

बराच वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याचा भाऊ अभिषेकला खोलीत बघायला गेला. तेव्हा तो त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला तात्काळ मंगल आनंद येथील सुश्रुत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी अभिषेकला मृत घोषित केलं. अभिषेकने मृत्यू का केला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा