पुण्यातील खेडशिवापूर टोलनाक्यावर नकली दारुचा कंटेनर पकडला, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

पुणे २१ जून २०२३: पुणे-सातारा महामार्गावरील कार्यक्षेत्रामध्ये, अवैध मदयसाठा प्रकरणी अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. काल मंगळवारी रात्री आठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत, उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या वतीने खेड शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचून बनावट दारू घेऊन निघालेला ट्रक पकडून कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यावरुन मोठ्या प्रमाणामध्ये बनावट दारु महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जातेय, या प्रकाराची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होती. त्या पार्श्वभूमीवर कंटेनर(NL01AA-7112) हा गोव्यावरुन बनावट दारू घेऊन मुंबईच्या दिशेने चालला आहे, अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संबंधित कंटेनरचा पाठलाग सुरू होता. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा कंटेनर खेड शिवापूर टोल नाका पास करून पुढे आला असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक तपासासाठी अडवला तेंव्हा त्यामध्ये विविध कंपन्यांची लेबल असलेल्या दारुच्या बाटल्यांची पोती व बॉक्समध्ये भरलेल्या दारू बाटल्या आढळून आल्या. या मुद्देमालाची किंमत ८५ लाख आहे. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सहभाग घेतला.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा