संतोष परब प्रकरणी नितेश राणेंना मोठा दिलासा, न्यायालयाने केला जामीन मंजूर

मुंबई, 10 फेब्रुवारी 2022: भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. खुनाचा प्रयत्न प्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने बुधवारी मंजूर केला. यापूर्वी सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. नितेश राणे अटक टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र कोर्टाने त्यांना शरण येण्यास सांगितलं आणि कोर्टात जामीन अर्ज दाखल केला. याप्रकरणी नितेश राणे यांनी 2 फेब्रुवारी रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं.

न्यायालयाने आपल्या आदेशात नितेश राणे यांना ट्रायल कोर्टात शरण येण्यास सांगितलं आणि या प्रकरणात नियमित जामिनासाठी अर्ज करण्याची सूचनाही केली. याआधी नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिकाही दाखल केली होती, जी न्यायालयाने फेटाळली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही नितेश यांच्या अटकेला 27 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही नितेश यांच्या अटकेवर 10 दिवसांची बंदी घातली होती, मात्र आज सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

नितेश राणे विरुद्धचा गुन्हा फिर्यादी संतोष परब यांच्याशी संबंधित आहे, त्यांनी आरोप केला आहे की, गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी कणकवलीतील नरवडे नाका येथून ते दुचाकीवरून जात असताना नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. संतोष परब यांनी दावा केला की, आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि हल्लेखोराने कारमधील दुसऱ्या व्यक्तीला पळून जाण्यापूर्वी “गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना सांगायला हवं” असं म्हणताना ऐकलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा