नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर २०२०: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि रंगोली चंदेल यांच्या विरोधात एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कंगना रनौत आणि रंगोली चंदेल यांचे वकील रिझवान मर्चेंट यांनी कोर्टात यांच्या वतीनं बाजू मांडली. कंगना रणौत यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांनी दोन समुदायांमध्ये आपल्या सोशल मीडिया पोस्ट द्वारे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयानं मुंबई पोलिसांना कंगना रनौत आणि रंगोली चंदेल यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश दिले आहेत. जिथंपर्यंत कंगना आणि रंगोलीचा प्रश्न आहे, कोर्टानं दोन्ही बहिणींना या विषयाशी संबंधित कोणतीही पोस्ट किंवा टिप्पण्या सोशल मीडियावर देणार नाहीत, असं बजावले आहे.
या व्यतिरिक्त कोर्टानं ८ जानेवारीला वांद्रे पोलिस ठाण्यात हजर राहावं असंही कंगना व रंगोली यांना सांगितलं आहे. याप्रकरणी कोर्ट ११ जानेवारी रोजी सुनावणी करंल. वरवर पाहता कोर्टानं या प्रकरणात कंगनाला एक प्रकारचा दिलासा दिला आहे, परंतु जिथपर्यंत हा प्रश्न आहे की, हा एफआयआर रद्द होईल का, तर त्यासंदर्भातील गोष्टींचा खुलासा पुढील सुनावणीतच होईल.
कंगना-रंगोली वर कोणते आरोप?
मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कंगनाच्या विरोधात दिलेल्या एफआयआरमध्ये तिच्यावर दोन समुदायांमध्ये फूट पाडण्याचे आरोप लावण्यात आले आहे, त्यानंतर आता कोर्ट या प्रकरणाची सुनावणी करत आहे. हा एफआयआर आयपीसीच्या कलम २९५ (अ) १५३ (अ) आणि १२४ (अ) अंतर्गत नोंदविला गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे