नांदेड, दि.१५ मे २०२० : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड मोटार सायकल व ड्रोन पेट्रोलिंगला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे कंटेनमेन्ट झोनमध्ये लागणारा पोलिस बंदोबस्त कमी होऊन पोलिसांवरील झोनचा ताण कमी होणार अाहे. कोरोना विषाणूने पोलिस अधिकारी, कर्मचारी संक्रमित होवू नये, या दृष्टीकोनातून शहरातील कंटेनमेन्ट झोनमध्ये
मोटार सायकलवर कोविड पेट्रोलिंगची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर : कोविड पेट्रोलिंगमुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होणार आहे. ही मोटार सायकल कंटेनमेन्ट झोनमध्ये पेट्रोलिंग करुन जनतेमध्ये कोरोना विषाणूसंदर्भाने जनजागृती करतील. तसेच कोणीही घराबाहेर निघणार नाही. याबाबत लक्ष ठेवतील. कोविड पेट्रोलिंगसाठी प्रायोगिक तत्वावर १० मोटार सायकली सुरु करण्यात आल्या असून लवकरच शहरात सुसज्ज अशा एकूण ३२मोटार सायकल सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्युज अन कट प्रतिनिधी: