अभिनेत्री पूनम पांडे विरोधात गुन्हा

17

मुंबई.दि.१२ मे २०२०: प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे हिच्यावर लॉकडाऊनचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असून तिच्या एका सहकाऱ्याच्या विरोधातही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम ही या इसमाबरोबर मरिन ड्राईव्ह परिसरात विनाकारण एक अलिशान कारमधून फिरत होती. म्हणून पोलिसांनी तिला अडवून तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. धोकादायक रोग प्रसाराच्या विरोधात जारी केलेल्या निर्बंधांचा भंग करणे, सरकारी आदेशांचा भंग करणे इत्यादी कलमांखाली तिच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्या ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: