बारामतीत चार सावकारांविरोधात गुन्हा

बारामती, १२ फेब्रुवरी २०२१: पाच लाख मुद्दल रकमेच्या बदल्यात १० लाख व्याजासह १५ लाख रुपये दिल्यानंतरही लिहून घेतलेली दोन एकर जमिन पलटून न देणाऱया चार सावकारांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर काशिनाथ वणवे, दत्तात्रय राजाराम वणवे (दोन्ही रा.लाकडी, ता. इंदापुर जि पुणे, महादेव उर्फ बिट्टु जालींदर सांगळे व मनोज विष्णु सांगळे (दोन्ही रा. जळोची, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. बापू श्रीरंग वणवे (रा.लाकडी) यांनी याबाबत फिर्याद दिली. सन २०१५ पासून ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २०१५ मध्ये फिर्यादीला मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी भास्कर व दत्तात्रय वणवे या भावकीतील दोघांना त्यांनी अडचण सांगितली. त्यांनी बिट्टू सांगळे यांच्याकडून पैसे घेवून देतो, व्याज द्यावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सांगळे यांनी फिर्यादीला ५ लाख रुपये दिले. त्यापोटी फिर्यादीकडून तीन कोरे चेक घेण्यात आले. आॅगस्ट २०१५ पर्यंत फिर्यादीने व्याजापोटी ९० हजार रुपये दिले.

परंतु त्यानंतर आरोपींनी सुरक्षेच्या कारणास्तव १७ आॅगस्ट २०१५ रोजी लाकडी येथील फिर्यादीची एक एकर जमिन खुश खरेदी म्हणून लिहून घेतली. त्यानंतर पुन्हा काही कालावधीनंतर आणखी एक एकर जमिन लिहून घेण्यात आली. २०१९ मध्ये भास्कर वणवे यांनी फिर्यादीच्या दुचाकीचे आरसी बुक नेले. ५ लाखाच्या बदल्यात १० लाखांच्या व्याजासह आजवर १५ लाख रुपये दिले असतानाही जमिन पलटवून दिला नाही.

२२ आॅक्टोबर २०२०रोजी ही जमिन आरोपींनी विकली. त्यानंतर या जमिनीचा ताबा संबंधिताला द्यावा यासाठी ३० आॅक्टोबर २०२० रोजी आरोपींनी घरी येत शिविगाळ, दमदाटी करत जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा