गोल पोस्ट गुन्हा हडपसर येथील ७ दारू दुकानांवर गुन्हे दाखल

हडपसर येथील ७ दारू दुकानांवर गुन्हे दाखल

पुणे, दि.५ मे २०२० : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील दारू दुकानदारांनी दारू विकताना कोणत्याही सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग आणि मास्कचा वापर केला नाही. त्यामुळे येथील सात दारू दुकानांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली.

दारूची दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या नियम व अटींचे पालन करून दुकाने उघडण्यास परवानगी दिली असताना या दुकानदारांनी मात्र, सरकारचे कोणतेही नियम पाळले नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये रोहित वाइन्स, शनी मंदिराजवळ, एम.आर. वाइन्स, ससाणेनगर, हडपसर, एशिएन वाइन्स, आकाशवाणी, हडपसर, एस. एस. घुले वाइन्स, रासकर चौक, हडपसर, अजंठा वाइन्स, गाडीतळ, हडपसर, राजधानी वाइन्स, हडपसर आणि कुणाल वाइन्स हडपसर या सात वाइन शॉपवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस नाईक बेंद्रे आणि करपे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version