क्रिस्टियानो रोनाल्डो बनला इंस्टाग्राम वरून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

14

पुणे, ११ ऑगस्ट २०२३ : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा इंस्टाग्राम वरून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. एका इंस्टाग्राम पोस्टवरून तो जवळपास २६ कोटी रुपये कमावतो. तर इंस्टाग्रामवर त्याचे ६०० मिलियन फॉलोअर्स आहेत.

सलग तीन वर्षे रोनाल्डोचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदाच फोर्ब्सने रोनाल्डोचा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश केला होता. त्याच वेळी, आता रोनाल्डो २०२३ च्या इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये वर आहे. एक प्रकारे, हे ऑनलाइन प्रभावाचे जागतिक मानक ठरले आहे.

रोनाल्डोनंतर या यादीत त्याचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीचे नाव आले आहे. अर्जेंटिनाकडून खेळणारा लिओनेल मेस्सी एका इंस्टा पोस्टसाठी २१.५२ कोटी घेतो. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी व्यतिरिक्त, टॉप २० च्या यादीत इतर सेलिब्रिटींची नावे समाविष्ट आहेत. या यादीत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार यांच्या नावाचाही समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड