टीका आणि टोमणे

मुंबई 9 जून 2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मधली सभा गाजली ती केवळ टीका आणि टोमणे यांमुळंच. मुख्यमंत्र्यांनी या सभेत भाजपवर टीका केली. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आम्ही पाहिला. 25 वर्ष शिवसेना भाजपने सडवली, अशा जहरी शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

या सभेतून भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी टीकेला प्रत्युत्तर दिलं. ही सभा केवळ टीका आणि टोमणे यांसाठी होती, असं फडणवीस यांनी सांगितलं

यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या सभेवर टोमणे मारले. औरंगाबादचं नाव संभाजीनगर केल्यास काँग्रेस पाठिंबा काढून टाकेल, अशी भीती शिवसेनेला वाटत आहे. म्हणूनच नामांतराचा विषय बाजूला ठेवला.

भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर शिवलिंगाच्या पोस्टवरुन निशाणा साधला. हिंदुह्रदय सम्राट यांचा मुलगा मुख्यमंत्री होतो, मग त्याला शिवलिंगाबाबत चुकीचं वक्तव्य करण्याची हिंमत कशी होते? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

एकुणातच मुख्यमंत्र्यांची सभा ही वाद आणि विवादांनी भरलेली ठरली. आता या सभेचा परिणाम नक्की काय होईल , कुठं होईल आणि कसा होईल हे पाहणं प्रत्येक पक्षासाठी गरजेचं ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा