पिके जोमात पण दर मात्र कोमात… लाँगडाऊन मुळे शेतकरी आला मेटाकुटीला

माढा, दि. २३ जुलै २०२०: माढा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड झालेल्या ऊसाचे व केळीचे पीक जोमात आले आहे. केळीचे पीक दोनच महिन्यात काढण्यात येणार आहे, या दोन्ही पिकाच्या काढण्याच्या कामासाठी कोरोना संसर्गाने मजूंरी मिळण्याचे संकट उभे ठाकले आहे व एकीकडे बाजारभावाची चिंता तर दुसरी कडे मजूर कंत्राटदार व वाहतूकदार देखील चिंतेत सापडलेले.

माढा तालुक्यातील उजनी बॅकवॉटरच्या क्षेत्रात शिराळ, उजनी, आढेगाव, आलेगाव, चांदज, गारअकोले, वडोली हा भाग ऊस व केळी पिकाची आगार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. परंतू कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे व लॉकडाऊनमुळे या भागातील शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. एकीकडे ऊस पिकाला बगल म्हणून केळी सारख्या पिकाकडे शेतकरी वळला होता, सध्या केळीचे पिक हे दोन महिन्यात परिपक्वतेला येत आहे. परंतू पुढील होणाऱ्या या रोगाच्या परिणामांमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

तसेच या भागात ऊस पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मागील वर्षी उजनी धरणातील पाणीसाठा आणि यावर्षी आलेला पाऊस यामुळे ऊस पिके जोमात आहे. चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा ऊस उत्पादकांना आहे, परंतू कोरोना या महामारीमुळे ऊस तोडणी कामगारांची अडचण असल्याने एक प्रकारची चिंता या भागातील शेतकऱ्यांच्या व ऊस वाहतूकदारांच्या मनामध्ये सतावत आहे.

ऊस तोडणी कामगारांना आम्ही पैसे दिले आहेत, परंतू ज्या भागातील मजूर या कामासाठी येतात त्याच भागात कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे, त्यामुळे मनात एक प्रकारचे चिंतेचे वातावरण आहे, असे उजनी टे चे सतिश व गणेश पाटील यांनी सांगितले.( वाहतूक शेतकरी)

केळी हे पीक जूलै महिन्यात काढण्यात येत आहे परंतू, कोरोना लॉकडाऊन मुळे योग्य बाजारभाव व व्यापाऱ्यांकडून माल एक्सपोर्ट होतो की नाही याची शंका शेतकरी वर्गात आहे.
— गोविंद गोपाळ भोसले बेंबळे केळी उत्पादक

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा