मुंबईच्या वांद्रेमध्ये मजुरांची गर्दी

वांद्रे, दि.१९ मे २०२० : देशातील लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यात आज ( मंगळवारी ) पुन्हा मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर हजारो कामगारांची गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांनी ट्रेन गेल्यानंतर गर्दी केली होती.याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गर्दी कमी करून परिसर आता रिकामा केला आहे.

याबाबत एका वृत्तवहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या कामगारांना सोमवारी रेल्वे जाणार असल्याचे फोन करून सांगण्यात आले होते . त्यामुळे त्यांनी वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत कामगारांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, सोमवारी ( दि.१८) रोजी आम्हाला दोन फोन व मेसेजेस आले होते, ज्यात वांद्रे स्थानकावरून आमच्यासाठी खास गाड्या चालवल्या जातील असे सांगण्यात आले होते. मात्र अस काही नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

याठिकाणी सर्व प्रवासी हे उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणारे होते. त्यामुळे कामगारांना खरच फोन आला की कुणी त्यांची दिशाभूल केली हे अजून सिद्ध झालेले नाही. पोलिसांकडून याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा