सीआरपीएफ नागपूर मध्ये स्थापना दिवस उत्सव मेळावा संपन्न

21

नागपूर २६ फेब्रुवारी २०२४ : २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ नागपुर मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सिपाही/कुक (महिला) गामिती आशा बेन, सिपाही/स.क. (महिला) डी. लक्ष्मी एव सिपाही/के. एस. टी. सुधारानी (महिला) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती किर्ती जाम्भोलकर, अध्यक्षा क्षेत्रिय संरक्षी कावा नागपुर, श्री. पी. आर. जाम्भोलकर पोलीस उपमहानिरीक्षक ग्रुप सेंटर सीआरपीएफ नागपुर, श्री.आई. लोकेंद्र सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक रेंज सीआरपीएफ नागपुर, डॉ. मनोज कुमार पोलीस उपमहानिरीक्षक (वैदकीय) सीएच सीआरपीएफ, श्री.जी.डी.पंढरीनाथ, कमांडेंट, ग्रुप सेंटर सीआरपीएफ, एव श्रीमती सियाम होई चिंग मेहरा, कमोडेंट २१३ (महिला) बटालियन सीआरपीएफ नागपुर, अन्य राजपत्रित अधिकारी, अधिनस्थ अधिकारी आणि सर्व सैनिक उपस्थित होते.

मेळाव्यात ग्रुप सेंटरमध्ये राहणारी सर्व सैनिकांचे कुटुंब व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्थापना दिवस उत्सव मेळाव्यात सीआरपीएफ द्वारा वापरली जाणारी सर्व प्रकारची आधुनिक शस्त्राचे प्रदर्शन करण्यात आले. प्रत्येक वर्गाच्या गरजेनुसार मनोरंजनाचे साहित्य उपलब्ध होते. लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन, जादुगर द्वारा जादुचे प्रदर्शन, रंगारंग कार्यकम करण्यात आले होते आणि कॅप परिसरात राहणारे मुलांनी आपली कला दाखविली.

या प्रसंगी विविध क्षेत्रातिल कलावंतांना त्यांच्या उत्कृष्ठ कलाकौशल्यासाठी श्री. पी.आर. जाम्भोलकर पोलीस उपमहानिरीक्षक ग्रुप सेंटर सीआरपीएफ नागपुर, यांच्या कडुन पारितोषिक आणि प्रस्तती पत्र देण्यात आले. हा भव्य मेळावा आयोजित केल्याबद्दल श्री.जी.डी. पंढरीनाथ, कमांडेंट यांनी ग्रुप सेंटर सीआरपीएफ, नागपुर यांचें आभार मानले आणि सैनिकांचे कौतुक केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे