बंगळुरू, ११ सप्टेंबर २०२२२ : कर्नाटक मधील रायचूर जिल्ह्यात एका शाळेत ७ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेत पँटीत शौच केली. यामुळे संतापलेल्या विकृत शिक्षकाने रागाला जाऊन या मुलाच्या अंगावर चक्क गरम पाणी ओतले वैद्यकीय अहवालानुसार विद्यार्थी ४० टक्के भाजला आहे. पीडित मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे.

रायचूर जिल्ह्यातील मस्की तालुक्यामध्ये संते कल्लूर गावात ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शालेय शिक्षणाधिकाऱ्यांच्या एका पथकाकडून,रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्याची भेट घेण्यात आली. विद्यार्थ्याकडून झालेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी हे पथक आले होते. परंतु विद्यार्थ्याला गंभीर इजाझालेली असल्यामुळे तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या पालकांनाही याबाबत कोणतीही माहिती नाही.

घटनेनंतर पोलिसांनी शाळेत जाऊन गावकऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. सदर घटना घडल्यानंतर फरार झालेल्या शिक्षकानेच हा सर्व प्रकार केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाची ओळख पटवली आहे. त्याचे नाव हुलीजेप्पा असे आहे. घटना घडल्यानंतर आरोपीने पीडित मुलाच्या आई-वडिलांना तक्रार देऊ नये यासाठी दमदाटी केली असल्याचेही समोर आले आहे.

या घटनेविषयी बोलताना पोलीस अधिकारी म्हणाले, की या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. परंतु याविषयी पोलिसात कोणीही तक्रार देण्यासाठी आलेली नाही. आमच्या पथकाने शाळेला भेट दिली आहे. शासन स्तरावर ही बाब शिक्षण विभागाच्या अंतर्गत येते. परंतु अशा परिस्थितीत पोलिसांकडून स्वत:हून दखल घेऊन कारवाई करण्यात येते. मागील काही दिवसांपूर्वी अंगणवाडी देखभाल केंद्रामध्ये एका मुलाने शिक्षकाच्या अंगावर लघवी केली म्हणून त्याला जाळून मारल्याची घटना एका शिक्षकांकडून घडली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा