गोल पोस्ट राष्ट्रीय …या कारणामुळे कापले आपले स्वतःचे गुप्तांग

…या कारणामुळे कापले आपले स्वतःचे गुप्तांग

हनुमानगड, २७ नोव्हेंबर २०२०: हल्ली कोरोना मुळे अनेकांची मानसिक स्थिती हि थोडी वेगळी झाली असून लोकांच्या मनामधे कुठल्याही वाईट विकृतीचा जन्म पहायला मिळतोय. ज्या मधे माणसाला पण काय करतोय याचे साधे भान देखील राहताना दिसत नाहीये. एका आठवड्यात आश्याच दोन वाईट घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.

पहिली घटना राजस्थानच्या हनुमानगड ची आसून हनुमानगड रेल्वे स्टेशन काॅलनी मधे राहणार्या एका युवकाने ब्लेडने स्वताचे गुप्तांग कापल्याची खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वताच्या घरी संध्याकाळी त्याने ब्लेडने गुप्तांगाचा एक भाग कापला. ज्या नंतर रूम मधे सर्वत्र रक्तच रक्त पसरले. तश्याच आवस्थेत त्याला हनुमानगड टाऊनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. हा असा वाईट प्रकार तरूणाने मुलगी होण्यासाठी केल्याचे कळत आहे.

बायको परत येत नाही म्हणून कापले स्वताचा गुप्तांग…..

उत्तर प्रदेशाच्या कानपूर मधे दुसरी घटना घडली आहे. प्रकाश या तरूणानं बायको माहेरुन परत येत नसल्याने स्वताचे गुप्तांग कापले. २६ वर्षीय या तरूणाचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला चार वर्षाचा एक मुलगा देखील आहे. पण दिड महिन्या पुर्वी बायकोला डेंग्यू झाला आणि ती माहेरी उपचारासाठी गेली. त्या नंतर धिरजच्या अनेक फोन नंतर ती येतच नव्हती आणि नंतर बोलणं ही बंद झालं त्या मुळे धिरज नैराश्यात गेला आणि त्याने स्वताचे गुप्तांगच कापून टाकले.

या दोन्ही घटनातील कारण हे फार क्षुल्लक होते. पण, सध्याच्या माणसांच्या मानसिकतेत इतका बदल झाला आहे की, ते काय कृत्य करत आहेत, याची जाणीव देखील त्यांना होत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version