फिनलंड संसदेच्या संकेतस्थळावर सायबर हल्ला, नाटो सदस्यत्व असंल का कारण?

फिनलंड, १० ऑगस्ट २०२२: फिनलंडच्या संसदेच्या वेबसाइटवर मंगळवारी सायबर हल्ला झाला. संसदेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, संसदेच्या बाह्य संकेतस्थळावर हल्ला करण्यात आलाय. सायबर हल्ल्यांमुळे वेबसाइट्स ऍक्सेस करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं हा हल्ला कोणी केला हे सध्या स्पष्ट झालेलं नाही, असं सांगण्यात येत आहे.

दुपारी अडीचच्या सुमारास फिनलंडच्या संसदेच्या वेबसाइटवर सायबर हल्ला झाला. यामुळे साइट खूपच मंद झाली आहे. एवढेच नाही तर साइटवर जाणेही अवघड झालं आहे. मात्र, सायबर हल्ला कोणी केला आहे, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच हा सायबर हल्ला हाणून पाडण्यासाठी संसदही पावले उचलत आहे.

संसदेने जारी केलेल्या निवेदनात नाटोच्या सदस्यत्वामुळे हा सायबर हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. सायबर हल्ल्यामुळे सेवा विस्कळीत झाली आहे. फिन्निश मीडियानुसार, याआधी जुलैच्या अखेरीस सायबर हल्ला झाला होता. एप्रिलमध्ये संरक्षण मंत्रालय आणि सरकारी वेबसाइटवर असेच सायबर हल्ले झाले असताना, ही समस्या त्वरीत सोडवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिनलंडच्या सिक्युरिटी अँड इंटेलिजेंस सर्व्हिस (SUPO) ने मे महिन्यात इशारा दिला होता की, रशिया फिनलंडच्या NATO अर्ज प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी अशी पावलं उचलू शकतो. त्यासाठी तो सायबर हल्ल्याचा मार्गही अवलंबू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा