नवी दिल्ली, दि. १९ मे २०२०: चक्रीवादळ अम्फान आता बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल करत आहे. चक्रीवादळाचा सध्याचा वेग १६० किमी/तासाचा आहे. सध्या ते दिघापासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९ मे रोजी या चक्रीवादळामुळे भयंकर आपत्ती उद्भवू शकते. चक्रवाती वादळ ‘अम्फान’ सोमवारी संध्याकाळी सुपर साइक्लोन मध्ये बदलला आहे.
बंगालच्या उपसागरा वर तयार झालेल्या चक्रीवादळाची गती आणि ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता ओडिशाच्या १२ आणि कोलकातासह बंगालमधील ५ जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालमध्ये दक्षिण २४ परगना, उत्तर २४ परगना, पूर्व आणि पश्चिम मेदनापूर उच्च सतर्क आहेत. पुढील आदेश येईपर्यंत मासेमारी प्रक्रियेवर बंदी आहे.
पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक:
चक्रीवादळ अम्फान आता एक सुपर सायक्लोन बनले आहे. जे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल करत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावून तयारीचा आढावा घेतला. ज्यामध्ये गृह मंत्रालय आणि एनडीएमएच्या अनेक अधिका-यांनी भाग घेतला. चक्रीवादळामुळे प्रभावित राज्यांना सर्व शक्य तेवढे केंद्रीय साहाय्य देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी