गोल पोस्ट राष्ट्रीय दाट धुक्यामुळे कोसळले विमान

दाट धुक्यामुळे कोसळले विमान

भोपाळ :  मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ढाणा येथे शुक्रवारी ( दि.३) रात्री ९च्या सुमारास चिमेस एव्हिएशनचे एक ट्रेनी विमान धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात कोसळले. या दुर्घटनेत मुंबईतील रहिवासी दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

अशोक मकवाना आणि पीयूष चंदेल (ट्रेनी) अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. रात्रकालीन उड्डाणानंतर हा अपघात झाला. धुके असल्यामुळे वैमानिकाला धावपट्टी न दिल्याने विमान ९०-१०० मीटर अंतरावर असलेल्या शेतात कोसळले. या घटनेनंतर चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वायएन शर्मा हे दिल्लीहून सागरकडे रवाना झाले आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version