बुलढाणा, ६ जून २०२३ : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर टीका करताना सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. इथे कुथेही वजन ठेवल्याशिवाय कोणतेही काम घडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली हेती. यावर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पलटवार केला आहे. दादा तुमच्या अजून चौकशा सुरू आहेत असे ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामकाजावर टीका करताना सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. इथे कोणतेही काम वजन ठेवल्याशिवाय काहीही काम घडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका केली हेती. त्यावरून आता शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पलटावार केला.
अजित पवार यांनी असे आरोप करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अजित पवार यांच्याविरोधात ईडीच्या सीबीआय सह अनेक संस्थांच्या चौकशा चालू आहेत. त्यामुळे जनतेला माहित आहे की भ्रष्टाचारी कोण आहे. त्यामुळे अजित दादांनी असे आरोप करणे चुकीचे असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर