दादासाहेब सोनवणे इंदापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी

इंदापूर दि.१४ जुलै २०२० : इंदापूर नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्विकृत नगरसेवक पदी दादासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली. सोनवणे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेल इंदापूर शहरचे कामकाज पाहत आहेत.

सामाजिक कार्यात कायम सहभाग घेत, शहरात पक्ष वाढ व विस्तारासाठी सोनवणे यांचे योगदान आहे. याच बाबीचा विचार करुन पक्षाकडून सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. दि. ३ जुलैच्या शासन आदेशानुसार बुधवारी दि.१४ रोजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. दुपारपर्यंत या सभेचे कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्दारे झाले.

पूर्वीचे स्विकृत नगरसेवक यांनी आपल्या पदाचा मागील चार महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यामुळे या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दादासाहेब सोनवणे यांना संधी देण्यात आली.सोनवणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने पीठासन अधिकारी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दादासाहेब सोनवणे यांच्या निवडीला मान्यता दिली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सोनवणे याना निवडीचे पत्र दिले.नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा आणि मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांनी दादासाहेब सोनवणे यांचा सन्मान केला.

न्युज अनकट प्रतिनिधी :निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा