दही खा..मजबूत रहा..

आहारात दह्याचा वापर हजारो वर्षांपासून करण्‍यात येत आहे. दह्यात प्रोटीन्‍स, कॅल्शियम, रायबोफ्लेवीन, व्हिटामीन बी, ही पोषकतत्वे आढळतात. दात आणि हाडे मजबूत राहण्‍यासाठी दुधापेक्षा दह्यामध्‍ये १८ टक्‍क्‍यापेक्षा जास्‍त कॅल्शियम असते. दह्यामुळे दात व हाडे मजबुत राहतात.

पचन शक्‍ती वाढते-
उन्‍हाळ्यात आहारात दह्याचा वापर केला तर उष्‍णतेचा वाईट परिणाम शरीरावर होणार नाही. शरीरातील अशक्‍तपणा दह्यामुळे कमी होतो. दुधाचे दह्यामध्‍ये रूपांतर झाल्‍यानंतर दह्यातील अम्‍ल पचनक्रिया सुरळीत करते.

शरीरातील उष्‍णता कमी करते –
उन्‍हाळ्यात दह्याचे ताक आणि लस्‍सी करूण प्‍यायल्‍यानंतर शरीरातील उष्‍णता कमी होते. उन्‍हात प्रवास करायचा असेल तर ताक किंवा लस्‍सी घेतल्‍यांनतर प्रवास करा. यामुळे उन्‍हाळी लागणार नाही. पोट बिघडले असेल तर भातासोबत दही खा, असे केल्‍यानंतर पोट साफ होईल.

आतड्याचे आजार
अमेरिकेतील आहार तज्‍ज्ञांनी सांगितले आहे की, प्रत्‍येक दिवशी आहरात दह्याचा वापर केला तर आतड्याचे आजार होत नाहीत.

हृदयाचे आजार
उच्‍च रक्तदाब, फुफ्फुसाचे आजार, याशिवाय हृदयात वाढणारे कॉलेस्‍ट्रॉलचे प्रमाण नियंत्रीत ठेण्‍याचे काम दह्यामुळे होते.

हाडाचे आजार-
दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्‍यामुळे हाडाच्‍या पोषणासाठी मदत करते. दात आणि बोटाची ‘नख’ दह्यामुळे मजबुत होतात.

सांधे दुखी
दह्यामध्‍ये थोडे हींग मिसळून खाल्‍ल्यानंतर सांधे दुखी, गुडघे दुखी यासारखे आजार दूर राहतात.

वजन-
सडपातळ व्‍यक्तिने रोज आहारात दह्यासोबत खोबऱ्याचा बाकुर आणि बदम खाल्लेतर वजन वाढवता येते.

सौंदर्य-
दही शरीरावर लावून स्‍नान केल्‍यानंतर त्‍वचा सुदंर आणि मुलायम होते. दह्यात लिंबाचा रस मिसळून शरीरावर लावल्‍यानंतर रंग उजळतो. दह्यात मध टाकून खाल्‍ल्‍यानंतर सौंदर्यात भर पडते.

केसाचे सौंदर्य –
दह्याच्‍या तयार करण्‍यात आलेल्‍या ताकाने केस धुतल्‍यानंतर आणि दह्यानी मालीस केली तर केस स्‍वच्‍छ आणि सुंदर दिसायला लागतात.

तोंड आल्‍यानंतर-
शरीरात उष्‍णात झाल्‍यानंतर तोंडात फोड येतात. या फोडांवर दह्याची मलाई लावल्‍यानंतर तोंडातील फोड राहत नाहीत.

रोग प्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी उपयोग
दही खाल्‍ल्‍यानंतर शरीरातील रोग प्रतिकारक शक्‍ती वाढते. दमा आणि अ‍ॅलर्जीसारख्‍या रोंगापासून आराम मिळवण्‍यासाठी दही आहारात घेणे आवश्‍यक आहे.

घाम-
उन्‍हाळ्यात शरीराला खूप घाम येतो. उन्‍हाळ्यात घामाचा वास जास्‍त येतो. दही आणि बेसन पीटाचे मिश्रणाने शरीराला मालीश करून स्‍नान करा. असे केल्‍यानंतर शरीरावर घाम येणार नाही.

लहान मुलांसाठी-
लहान मुलांना दात येते वेळी खूप त्रास होतो. अशा वेळी मध आणि दह्याचे मिश्रण लहान मुलांना दिल्‍यानंतर दात येताना त्रास होत नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा