कान्स चित्रपट महोत्सवात होणार डान्सर सपना चौधरीच पदार्पण

पॅरिस १८ मे २०२३: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणार आहे. यापूर्वीही सपना चौधरीने देश-विदेशात अनेक मोठ मोठे शो करून आपल्या नृत्य अदाकारीने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. कान्सचा मान मिळवणारी सपना ही दुसरी हरियाणवी कलाकार ठरली आहे. मुळची हरियाणाची असलेली माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने सपनाच्या आधी कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे.

आज भारत देशातच नाही तर परदेशातही सपना चौधरी चे असंख्य चाहते आहेत. आपल्या करिअरची सुरुवात हरियाणाच्या ऑर्केस्ट्रापासून सुरुवात करणाऱ्या सपनाने, नंतर स्टेज डान्सला सुरुवात केली आणि कधी मागे वळून पाहिले नाही. सपना ‘बिग बॉस’च्या ११व्या सिझन मध्ये स्पर्धक म्हणून सुद्धा सहभागी झाली होती. सपनाचा बिग बॉस मधील प्रवास फार मोठा नव्हता तरी तिने प्रेक्षकांची मने जिंकली. तिथे तिने तिच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. तिने हिंदी चित्रपटांमध्ये आयटम साँग ही केले आहेत.

सपनाच्या डान्स शो ला प्रचंड डिमांड आहे. ती प्रसिद्ध हरियाणवी गायिका आणि नृत्यांगना आहे. सपनाने सर्वप्रथम हरियाणवी गाण्यांवर डान्स करून लोकप्रियता मिळवली. सपना चौधरीचे ‘ड्रीम्स एंटरटेनमेंट’ असे एक यूट्यूब चॅनल देखील आहे. यावर तिचे अनेक प्रसिद्ध डान्स व्हिडिओ आणि रिल्स बघायला मिळतात.

कान्स चित्रपट महोत्सव पदार्पणाबद्दल सपना म्हणाली की, या महोत्सवाचे आमंत्रण मिळणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, त्यामुळे मी खूप उत्साहित आहे. या चित्रपट महोत्सवासाठी मी कोणतीही विशेष तयारी केलेली नाही, पण तिथे काय करायचे, याबद्दल मी खूप उत्सुक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा