“दानिश ने आमची परवानगी घ्यायला हवी होती”, दानिशच्या हत्याप्रकरणी तालिबानचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली, २२ जुलै २०२१: आपली प्रतिमा वाचवण्यासाठी अफगाणिस्तानला ताब्यात घेण्याच्या लढाईत गुंतलेला तालिबान आता भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीच्या हत्येपासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. स्पिन बोल्दकवर तालिबानी हल्ल्यात दानिशचा मृत्यू झाला. ते मीडिया कव्हरेजसाठी युद्धग्रस्त भागात गेले होते परंतु तालिबान हल्ल्याला बळी पडले. दानिश सिद्दीकी हत्त्या याप्रकरणी तालिबान वर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात, तालिबान आता या हत्येबाबत आपली भूमिका नाकारण्यात व्यस्त आहे. त्याउलट तो निर्भत्सपणे वाद घालत आहे की जर दानिशला तेथे कव्हरेजसाठी यायचे असेल तर त्यांनी आधी तालिबानची परवानगी घ्यायला हवी होती.

यापूर्वी अफगाण सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांनी सांगितलं होतं की, तालिबान्यांनी दानिश च्या देहाची किती विटंबना केली आहे. यामागचे कारण अफगाण कमांडरने सांगितलं की, दानिश भारतीय होते आणि तालिबान्यांना भारताबद्दल द्वेष आहे. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार अशरफ वानी यांनी कंधार येथे तालिबानचे प्रवक्ते आणि कमांडर मौलाना यूसुफ अहमदीशी चर्चा केली. मुलाखत दरम्यान तालिबान कमांडर काय बोलले ते जाणून घेऊया…

• प्रश्न- अफगाणिस्तानात तालिबानची ताजी परिस्थिती काय आहे, तुमच्या ताब्यात असलेलं क्षेत्र किती आहे?
👉 उत्तर- बिस्मिल्ला रहमान रहिम, आम्ही सुमारे ८५ टक्के अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. लवकरच आम्ही १५ टक्के भाग देखील ताब्यात घेऊ.

• प्रश्न- असं म्हणतात की पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय तालिबान्यांना पूर्ण पाठिंबा देत आहेत आणि रसदही पुरवित आहेत?
👉 उत्तर- नाही, हा आमच्या शत्रूंनी पसरवलेला प्रपोगेंडा आहे, आम्ही आमच्याच बळावर लढा देत आहोत आणि भविष्यातही स्वबळावर लढा देऊ.

• प्रश्न- अफगाणिस्तानातील बरेच लोक, विशेषत: महिलांना तालिबान आणि तुमच्या राजवटीची भीती वाटते.
👉 उत्तर- नाही, हे बरोबर नाही, आम्ही महिला आणि अफगाणिस्तानातील इतर लोकांना सर्व अधिकार देऊ.

• प्रश्न- अलीकडं अफगाणिस्तानाच्या बर्‍याच भागात पोस्टर्स दिसली ज्यात असं म्हटल होतं की महिलांच्या संचारावर आणि नोकरी करण्यावर बंदी आहे.
👉 उत्तर- नाही, आम्ही नियम किंवा ऑर्डर असलेली कोणतीही पोस्टर्स लावलेली नाहीत. आमच्या शत्रूंनी आमची बदनामी करण्यासाठी हे पोस्टर्स लावले होते.

• प्रश्न- अलीकडेच तालिबान्यांनी स्पिन बोल्डक येथे भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकीवर हल्ला करून त्यांची हत्या केली, का?
👉 उत्तर- आम्ही त्यांना मारले नाही, ते शत्रू सैन्यासमवेत होते आणि जर कुठल्याही पत्रकाराला इथे यायचे असेल तर आमच्याशी बोला, आम्ही देशातील पत्रकारांशी आधीच संपर्कात आहोत.

• प्रश्न- तालिबान्यांनी मालमत्ता आणि विशेषतः भारताने बांधलेल्या पायाभूत सुविधांचं नुकसान का करीत आहे?
👉 उत्तर- ही आमची बदनामी करण्यासाठी शत्रूंची युक्ती आहे. युद्धाच्या काळात शत्रू सैन्य पायाभूत सुविधांचं नुकसान करीत आहे. आम्ही केवळ छावणीचे आणि पोस्टचे नुकसान करीत आहोत जेणेकरून ते पुन्हा वापरता येणार नाहीत. आम्ही रुग्णालये आणि शाळांचं नुकसान करीत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा