जगातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा चंदीगडमध्ये बनवण्यात आला होता.
अगदी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे दिसावा असंच रावणाचं रूप होत.या महाकाय रावणाच्या पुतळयाचं
विजयादशमीच्या मुहूर्तावर दहन केलं गेलं.
या रावण दहनासाठी चंदीगडच्या धनास मैदानात जय्यत तयारी करण्यात आली होती.
या रावणाची खासियत म्हणजे त्याची उंची तब्बल 221 फूट इतकी होती. हा रावण ना पडू शकेल ना त्याला गळती
लागेल. जवळपास 70 ते 100 किलोमीटर वेगवान वा्यांचा सामना करण्याची क्षमता या पुतळ्यात होती. हा पुतळा अडीच लाख वर्ग फुटांच्या जागेत उभारण्यात आला होता. पुतळ्याच्या जवळ जाण्यास कुणालाही परवानगी न्हवती.
800 फुटांवरून रिमोटच्या सहाय्यानं या पुतळ्याचं दहन केलं गेलं.
या रावणाच्या पुतळ्याची खासियत म्हणजे कुठूनही त्याच्याकडे पाहिलं तर तो तुम्हालाच पाहतोय असं वाटेल.
बराडा अंबालातील मूर्तीकार निवासी राणा तेजिंदर सिंह चौहान यांनी या पुतळ्याची निर्मिती
केलीय. जवळपास 40 सुरूक्षारक्षक या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आले होते. तर विजयादशमीच्या
दिवशी अड़चशे बाऊन्सर्स तैनात करण्यात आले होते. त्यामुळे
जगातील सर्वात मोठ्या रावण दहनाची उत्सुकता तमाम देशवासियांना लागली होती.