नीरा येथील दत्तघाटावर होणारा दत्त जयंती उत्सव रद्द

पुरंदर, २१ डिसेंबर २०२०: पुरंदर व खंडाळा तालुक्यातील सीमेवर नीरा नदी काठी असलेल्या नीरा-पाडेगाव येथील दत्त मंदिरातील दर वर्षी होणारा दत्तजयंती उत्सव सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. आज देवस्थानाची कमिटी व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पारपडली यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

नीरा नदीकाठावर असलेल्या दत्त मंदिरात दरवर्षी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुरंदर,खंडाळा व फलटण तालुक्यातील अनेक भक्त या सोहळ्याला मोठी गर्दी करतात. सध्या कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने गर्दीचे कार्यक्रम न घेण्या बाबत सूचना दिल्या आहेत. त्यामूळे आज लोणंद पोलीस सेशनाचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप काकडे, उपाध्यक्ष जनार्दन दानवले, खजिनदार नितीन कुलकर्णी, सचिव व्यंकट धायगुडे, पुजारी सचिन घोडके, आनंद देशपांडे, समिर पाळधिकर, आनंद देशपांडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी सर्वांनी एकमताने हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र देवाचे नित्य नियमाने होणारे विधी दहा लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. त्यामूळे दि.२९ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त कोणी ही मंदिर परिसरात गर्दी करू नका असे आवाहन अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी केले आहे.

गर्दी झाल्यास पोलिसांचा कारवाईचा इशारा

दरम्यान दत्त जयंतीला दर वर्षी होणारी गर्दी पाहता पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या काळात गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा