नीरा दत्तघाटावर दत्तजन्मोत्सव भक्तीभावात

पुरंदर, ३० डिसेंबर २०२०: ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या जयघोषात नीरा (ता.पुरंदर) येथील दत्तघाटावरील दत्तजयंती सोहळा थोडक्या लोकांत फुले उधळून उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची, पताकांची सजावट करुन विद्युत रोषनाई करण्यात आली होती.

सेवेकऱ्यांनी मंदिर परिसरात गर्दी होणार नाही यासाठी काळजी घेतली, तसेच भाविकांमध्ये जनजागृती करत थोडक्याच लोकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साध्या पद्धतीत पण भक्तीभावात साजरा केला.

पुरंदर तालुक्यातील नीरा येथील नीरा नदीच्या पैलतीरावरील दत्तघाटावर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी थोडक्या लोकांच्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीनिमित्त येथे तीन दिवशीय दत्तचरित्र पारायण सुरू होते. पाच लोकांच्या उपस्थित मंगळवारी दुपारी १२ वाजता पारायणाची सांगता झाली. प्रवचनाने उत्सवाची समाप्ती झाली.

मार्गशीर्ष पोर्णिमा श्री दत्त जयंतीनिमित्त पहाटे काकडा आरती, सकाळी सहा वाजता महाअभिषेक, दुपारी होमहवण, श्री दत्त गायश्री व स्वामी गायत्री यज्ञ झाला. सायंकाळी नारायण महाराज गोसावी यांचे ‘श्री जन्मांचे’ फुलाचे प्रवचन झाले. सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान पारंपारिक पद्धतीने फुले उधळीत दत्त महाराजांचा जन्मसोहळा पार पडला.

श्री दत्तजन्मानंतर मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता दत्त सेवा मंडळाच्या वतीनी घेण्यात आली. दिवसभर ग्रामस्थांनी दत्तघाट परिसरात येण्याचे टाळले. दिवसभरात भजन, किर्तन आदि कार्यक्रमांना फटा देण्यात आला होता. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप काकडे, उपाध्यक्ष जनार्दन दानवले, खजिनदार नितीन कुलकर्णी, सचिव व्यंकट धायगुडे, पुजारी सचिन घोडके, आनंद देशपांडे, समिर पाळधिकर, आनंद देशपांडे यानसह ठरावीक दत्तभक्त उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा