गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा दत्तात्रय भरणे व यशवंत माने यांचा इंदापूर मध्ये नागरी सत्कार

दत्तात्रय भरणे व यशवंत माने यांचा इंदापूर मध्ये नागरी सत्कार

इंदापूर (प्रतिनिधी )– दत्तात्रय भरणे यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री पदी व शेळगावचे सुपुत्र यशवंत माने यांची मोहळ विधानसभेच्या आमदार पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने रविवारी दि. ५ जानेवारी रोजी इंदापुर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांचे प्रमुख उपस्थितीत जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळी १० वाजता अकलूज नाका श्रीराम वेस येथून रॅलीला सुरवात होऊन मुख्य बाजारपेठेतून ही रॅली शहा सांस्कृतिक भवन येथे येईल व तेथे जाहीर नागरी सत्कार होईल. तरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version