गोल पोस्ट कृषी नवीन वर्षाच्या सुरूवातीला मोदी सरकारत शेतकऱ्यांना गिफ्ट

नवीन वर्षाच्या सुरूवातीला मोदी सरकारत शेतकऱ्यांना गिफ्ट

तुमकूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी ११ हजार कोटी रुपये ट्रांसफर करणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी देशभरातील शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहेत. कर्नाटकमधील तुमकूर येथील आयोजित एका समारंभात पंतप्रधान देशभरातील वर्षाकाठी २००० रुपयांचे तीन हफ्ते असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करणार आहेत.

जवळपास ८ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट २००० रुपयांचा पहिला हफ्ता जमा करणार आहेत. त्यामध्ये अनेक शेतकरी हे असे आहेत ज्यांना या आर्थिक वर्षात २००० रुपयांचा दुसरा हफ्ता जमा करण्यात येणार आहे. तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज जवळपास ११ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version