टीव्ही बंद केला म्हणून सुनेने छाटली सासूची बोटे; पतीच्याही कानशिलात लगावली

8

मुंबई, ९ सप्टेंबर २०२२: सासूने टीव्ही बंद केला म्हणून सुनेने सासूबाईची तीन बोटे छाटून टाकल्याची घटना सोमवारी ठाण्यातील अंबरनाथ येथे घडली आहे. हे कमी म्हणून की काय, नंतर तिने पतीच्याही कानशिलात लगावली. या प्रकरणी सासूने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सूनेविरुध्द तक्रार दाखल केली आहे.

या घटनेमुळे खळबळ माजली आहे. सासू आणि सून यांच्यात काही कारणांवरुन एरव्ही कुरबुरी होत असतात. मात्र, या घटनेत सून हिंसक झाली आणि तिने सासूवरच हल्ला केला. झालं असं की, सासूबाई घरात पुजा करण्यात मग्न होत्या. व त्या भजनही गात होत्या. मात्र, बतीस वषीय सुनबाई घरात मोठ्या आवाजात टीव्ही पाहत होती.

पुजा करताना मोठा आवाज येत असल्याने सासूने सूनेला टीव्ही बंद करण्यास सागिंतले. सूनेने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर सासूने स्वतः उठून टिव्ही बंद केला. सासूने टिव्ही बंद करताच सून संतापली आणि धारदार शस्त्राने हल्ला करत सासूचे बोटे कापून टाकली.

हा वाद पाहून महिलेचा पती दोघींमध्ये पडला. मात्र, पत्नीने पतीलाही कानशिलात लगावली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सूनेला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर