मुंबई, १० नोव्हेंबर २०२०: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेचा अखेर लिलाव झाला. दिल्लीच्या दोन वकिलांना दाऊदच्या ६ मालमत्ता मिळाल्या आहेत. यातून २२ लाख ७९ हजार ६०० रुपये सरकारने कमावले. वकील अजय श्रीवास्तव यांना दाऊद इब्राहिमची दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांना दाऊद इब्राहिमच्या चार मालमत्ता मिळाल्या आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इकबर मिर्चीची मालमत्ता यावेळी देखील निलामीमध्ये विक्री करता आली नाही. त्याची मालमत्ता जुहूमध्ये आहे. निविदाकारांचा असा विश्वास आहे की मालमत्तेचं मूल्य खूप जास्त आहे. म्हणून त्यांनी बोली लावण्यापासून माघार घेतली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची वडिलोपार्जित हवेली केवळ ११ लाख २ हजारांना विकली गेली. यावेळी, दाऊदची मालमत्ता दिल्लीच्या दोन वकिलांनी खरेदी केली. त्यापैकी दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांना दोन आणि दिल्लीच्या भूपेंद्र कुमार भारद्वाज यांना ४ मालमत्ता मिळाल्या आहेत.
त्यापैकी भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी ४, ५, ७ आणि ८ या क्रमांकाच्या मालमत्ता खरेदी केल्या. तर मालमत्ता क्रमांक ६ व ९ वकील अजय श्रीवास्तव यांनी घेतली आहे. दाऊदची मालमत्ता क्रमांक १० परत घेण्यात आली. कारण त्यात एक तांत्रिक समस्या होती. त्या मालमत्तेच्या सीमेवर काही वाद झाल्याचे सांगितलं जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे