डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड-प्रतिबंधक औषधाला डीसीजीआयची मंजुरी

नवी दिल्ली, ९ मे २०२१: हैदराबादच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरएल) च्या सहयोगातून संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) या प्रयोगशाळेने कोविड -१९ विरोधात उपचारात्मक अनुप्रयोग करण्यासाठी २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी) हे औषध विकसित केले आहे. क्लिनिकल चाचणी परिणामांनी असे दर्शविले आहे की हे रेणू, रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना जलद बरे होण्यास मदत करतात आणि ऑक्सिजन वरील अवलंबित्व कमी करतात. २-डीजीने उपचार केलेल्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांची आरटी-पीसीआर निगेटिव्ह दिसून आली. कोविड -१९ ग्रस्त लोकांना या औषधाचा प्रचंड फायदा होईल.
महामारीविरोधात सज्जतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डीआरडीओने २-डीजी-कोविड-विरोधी उपचारात्मक अनुप्रयोग विकसित करण्याचा पुढाकार घेतला.
विविध मानकांच्या धर्तीवर कार्यक्षमतेचा कल बघता प्रमाणित औषधांच्या तुलनेत २-डीजीने लक्षणे असलेले रुग्ण जलद बरे झाले.
यशस्वी निकालांच्या आधारे डीसीजीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू मधील २७ कोविड रुग्णालयात २२० रुग्णांवर III ऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा सविस्तर डेटा डीसीजीआयकडे सादर करण्यात आला. २-डीजी आर्ममध्ये, रुग्णांचे प्रमाण जास्त प्रमाणात लक्षणानुसार सुधारले गेले आणि एसओसीच्या तुलनेत तिसऱ्या दिवसापर्यंत पूरक ऑक्सिजनवरील अवलंबित्व (४२% च्या तुलनेत ३१%) कमी झाले जे ऑक्सिजन थेरपी / अवलंबित्व यापासून लवकर सुटका दर्शवते.
६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये असाच कल दिसून आला. ०१ मे २०२१ रोजी डीसीजीआयने कोविड -१९ च्या मध्यम ते गंभीर रूग्णांना या औषध उपचारासाठी थेरपी म्हणून आपत्कालीन वापरास परवानगी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा