दे धक्का…इथून धक्का …तिथून धक्का…

4

मुंबई, १८ जुलै २०२२: उद्धव ठाकरे यांना धक्के मिळण्याचे सिलसिले थांबत नाहीत. आमदारांच्या पाठोपाठ आता खासदारांनीही उद्धव ठाकरे आणि तथाकथित शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे आता खरोखरच शिवसेना खिळखिळी व्हायला लागली आहे.
शिवसेनेचे १२ खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली. यामुले शिवसेनेत खदखद असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. तब्बत १२ खासदार सेनेतून बाहेर पडणं, याचा अर्थ शिवसेनेचे खांब आता पडल्यातच जमा असं म्हणावं लागेल.

या १२ खासदारांमध्ये भावना गवळी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे, संजय जाधव, सदाशिव लोखंडे, प्रताप जाधव, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार १९ जुलैला दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असून आपली व्यथा मांडणार आहे. यावरुन शिंदे गटात किती रोष असेल याची कल्पना येते. या पत्रकार परिषदेत नेते काय बोलणार याकडे लक्ष असून नक्की शिवसेनेत काय चालू आहे, हे समजू शकेल.

याच पार्श्वभूमीवर शिंदेगटाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाली असून प्रवक्ते म्हणून दिपक केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेगटाची सरशी होते, हे दिसून येतंय. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या भेटी गाठी फळत नाही आहेत. तर आदित्य ठाकरेंची निर्धार यात्रा कमी पडते आहे, हे खरं. पण त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य धोक्यात आहे, हेच वास्तव मानावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा