सटलवाड ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवाराचा मृत्यू

पुरंदर, ५ जानेवारी २०२१: पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथील बिनविरोध निवडून आलेल्या महिला उमेदवाराचा आज पहाटे तीन वाजले च्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या त्या बहीण होत्या. शोभा बाळासाहेब यादव असं त्यांचं नाव आहे.

शोभा यादव यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. यादव यांची सटलवाडी यादववाडी ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या कांग्रेस पक्षाकडून ग्रामपंचायतीसाठी उभ्या होत्या. तीन ते चार दिवसांपूर्वी सटलवाडी यादववाडी या ग्रुप ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्य पदी विजय शिवतारे यांच्या बहीण शोभा बाळासाहेब यादव यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती.

त्या काँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढवीत होत्या. एकंदरीतच निवडणुकीच्या धावपळीमुळे झालेल्या दगदगीमुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. शोभा बाळासाहेब यादव यांच्या निधनानंतर सटलवाडी यादववाडी ग्रामपंचायतीतील ती जागा रिक्त राहणार आहे. एकंदरीतच अवघ्या तीनच दिवसांपूर्वी बिनविरोध निवड झालेल्या शोभा यादव यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा