पुरंदर, दि.१मे २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका वृद्धाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. आज सकाळी त्याला उलटीचा त्रास झाल्यानंतर त्याला रूग्णालयात नेले असता त्याला डाॅक्टरांनी मृत घोषित केले.
जेजुरी (ता.पुरंदर) येथे असंघटीत कामगारांसाठी ए.सी. हुंडेकरी शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कॅम्पमध्ये ६९ कामगार वास्तव्यास आहे. या मध्ये बाळू पवार नावाचा ६८ वर्षीय ईसम रा.खराबवाडी, ता.खेड,जि.पुणे हा दि.१२.४.२०२० रोजी राहण्यास आला होता. आज सकाळी त्याला रक्ताची उलटी झाल्याने, तेथील लोकांनी नोडल अधिकारी बाळासाहेब बागडे यांना याबाबत माहिती दिली.
यानंतर पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच तो मृत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. पवार यांच्या मृत्यूचे कारण आद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबतची खबर बाळासाहेब बागडे यांनी जेजुरी पोलिसात दिली आहे.अधिकचा तपास जेजुरी पोलिस करीत आहेत.
परराज्यातील कामगारांना घरी पाठवणार
दरम्यान आज पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या गावाकडे पाठवण्याची सोय शासन करित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कामगारांनी घरी जण्यासाठी कोणत्याही गैर मार्गाचा वापर करू नये असे अवाहन त्यांनी केले आहे.त्याच बरोबर जेजुरीतील मृत कामगाराच्या संपर्कातील लोकांच्या आरोग्यावर आरोग्या विभाग लक्ष ठेवुन असल्याचे त्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे