अल्कोहोल मिश्रित विषारी पदार्थ पिल्याने शेतमजुरांचा मृत्यू

9

सांगली, २० ऑगस्ट २०२२: आंध्रप्रदेश मधील आनंतपुर येथे सांगली जिल्ह्यातील तीन शेतमजुरांचा नशा करण्यासाठी अल्कोहोल मिश्रित विषारी पदार्थ पिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत तिघेही सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातले सावळज व सिद्धेवाडी येथील आहेत. सदाशिव सदाकळे व दीपक जयसिंग शिरतोडे हे दोघे सावळज येथील राहणारे आहेत व भरत नामदेव चव्हाण राहणार सिद्धेवाडी अशी तिघांची नावे आहेत.

हे तिघे शेतमजूर आंध्रप्रदेशमधील एका द्राक्ष व्यापाऱ्याकडे कामासाठी होते. सदाशिव, दीपक व भरत हे तिघे शेतमजूर म्हणून काम करत होते. आंध्र प्रदेश मधील अनंतपूर येथे एका द्राक्ष व्यापाऱ्याकडे त्यांच्या शेतात बऱ्याच दिवसांपासून काम करायचे. दरम्यान द्राक्ष व्यापाऱ्यांने त्यांना राहण्यासाठी जागा ही दिली होती.मागील दोन दिवसांपूर्वी तिघेही दारू पिण्यासाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी पदार्थ पिले असल्याचे समजते. हे द्रव पिल्यानंतर काही तासात त्या तिघांची प्रकृती बिघडली.

घटना घडली त्या दिवशी शेतातील घरात हे तिघेजण होते. त्या तिघांशिवाय कोणी नव्हते. अल्कोहोल प्राशन केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडू लागली. परंतु त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. ही घटना समजताच द्राक्ष व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहिले. त्यावेळी भरत चव्हाण यांचा मृत्यू झाला होता.व इतर दोघांची प्रकृती गंभीर बनली होती. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने सावळज व सिद्धेवाडी परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर