गोल पोस्ट इतर राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

मुंबई, ९ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीच्या ट्विटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे. ट्विटमध्ये आक्षेपार्ह गोष्टी लिहून शरद पवारांचा निकालही धक्कादायक असेल असं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तक्रार देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचल्या. सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन पत्रकारांशी संवाद साधताना तातडीने कारवाईची मागणी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘शरद पवार यांना काही झाले तर त्याला देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार असतील. याची जबाबदारी सरकारच्या गुप्तचर यंत्रणेची आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती गुप्तचर यंत्रणेतील अपयश स्पष्टपणे दर्शवते. महाराष्ट्रात भीतीचे वातावरण आहे. येथे गुन्हेगारी वाढत आहे. मी अमित शहांना विनंती करते की, राज्यात काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे.

यासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बोलणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार सुळे यांनीही राज्यातील वाढता जातीय तणाव आणि महिलांवरील वाढत्या अत्याचारावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे सरकार बेटी वाचवा आणि बेटी शिकवा अशा गप्पा मारते, पण आज महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचे काय? हे सांग.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया देताना धमक्या देणे आमच्या रक्तातच नाही, असे सांगितले. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version