समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, २२ जानेवारी २०२३ : समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

आबू आझमी यांनी औरंगजेबाचे समर्थन केले होते. यावरुन त्यांच्या पीएला एक धमकीचा फोन आला होता. आझमी यांना शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आझमींना फोन दे. तो पुन्हा बोलला तर उडवून टाकणार. कापून टाकणार, अशी अज्ञाताने धमकी दिली.

याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कुलाबा पोलिसांनी कलम ५०६ (२) आणि ५०४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

नेमके प्रकरण काय ?

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत वक्तव्य केले होते. तो क्रूर आणि द्वेष्टा नव्हता असे आव्हाड म्हणाले होते. यावरून राज्यात वादंग निर्माण झााले होते. दरम्यान, अबू आझमींनीही औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला गेला असे म्हटले होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना धमकी फोन आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा