समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई, १९ ऑगस्ट २०२२: एनसीबीचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे‌. वानखेडे यांच्या ट्टिटरवर धमकीचा मेसेज आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी समीर वानखेडेना ही धमकी देण्यात आली. गोरेगाव पोलीस ठाण्यात या बाबतची माहिती त्यांनी दिली . आरोपीने टॅग करुन हा मेसेज केला होता. यावर वानखेडे यांनी त्याला उत्तर देखील दिले. त्या नंतर आरोपीने ते ट्टिट डिलिट केले.

तपासात हे अकाउंट त्याच दिवशी सूरु करण्यात आले होते अशी माहिती समोर आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी क्रुझ प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जिल्हा जात प्रमाणत्र पडताळणी समितीने मोठा दिलासा मिळाला होता.

या धमकी प्रकरणी अजून कोणाचा हात आहे कि दुसरा काही हेतू आहे ते पोलीस कसून चौकशी करत आहेत. असे गोरेगावच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा