केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर, १४ जानेवारी २०२३ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. अज्ञात व्यक्तीकडून गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहेत. या बातमीनंतर मोठी खळबळ माजली असून पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात शनिवारी तब्बल तीन वेळा धमकीचे कॉल आले. पहिला कॉल सकाळी ११ वाजता त्यानंतर साडेअकरा आणि पुन्हा बारा वाजता हे कॉल आले. कॉलमध्ये दाऊदच्या आवाजात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता गडकरींच्या नागपूरमधील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा