मुंबई, ९ जुलै २०२३ : जसे आपण आपला मोबाइल नंबर न बदलता, एका कंपनीच्या टेलिकॉम ऑपरेटरवरून दुसऱ्यावर ऑपरेटरवर जाऊ शकता, तशाच पद्धतीने आपले डेबिट आणि क्रेडिट कार्ड याची पोर्टेबिलिटी आता आपल्याला शक्य होईल. १ ऑक्टोबरपासून बँकांचे खातेधारक त्यांचे क्रेडिट, डेबिट कार्ड पोर्ट करू शकतील. म्हणजेच कार्ड बाबतीतील डिटेल्स तेच राहतील, पण आपण दुसऱ्या बँकेची सेवा घेऊ शकतो. याबाबत त्रुटी किंवा सूचना तसेच मार्गदर्शक गोष्टी सुचविण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकतंच एक परिपत्रक काढलं आहे.
RBI ने परिपत्रक जारी करून माहिती देताना सांगितलंय की, १ ऑक्टोबरपासून कार्ड सेवा देणाऱ्या बँका या त्यांच्या खातेधारकांना त्यांच्या आवडीचे नेटवर्क, म्हणजेच दुसऱ्या बँकेची सेवा निवडण्याचा पर्याय देतील असा प्रस्ताव देण्यात आलाय. बँक किंवा वित्तीय संस्थेने विशिष्ट नेटवर्कसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्री-पेड कार्ड देऊ नयेत. ही कार्डे सर्व नेटवर्कवर वापरण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडीचे नेटवर्क निवडता येईल. यासाठी RBI ने ४ ऑगस्ट पर्यंत या पोर्टेबलिटीच्या मसुदा परिपत्रकावर बँका आणि ग्राहकांकडून सूचना मागवल्या आहेत.
RBI ने उचललेलं हे पाऊल बघता, कार्ड पोर्टेबिलिटी आवश्यक होती असं दिसतंय. कारण सध्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्डसाठी वेगवेगळे नेटवर्क असल्याने मार्केटमध्ये नेटवर्क कंपन्यांची मक्तेदारी आहे. व्यापारी आणि कार्ड वापरकर्त्यांमधील व्यवहार सुलभ करण्यासाठी, कार्ड नेटवर्क पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. त्यासाठी ते शुल्कही घेतात. क्रेडिट कार्ड कुठे वापरले जाऊ शकते आणि कुठे वापरता येणार नाही, हे कार्ड नेटवर्क ठरवतात. ही मक्तेदारी कमी करून भारतीय रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय नवीन नियम आणतय. कारण, यूएस ‘व्हिसा’ आणि ‘मास्टरकार्ड’ हे प्रामुख्याने कार्ड सुविधा पुरवतात, पण त्यांच्या नेटवर्कमध्ये RuPay कार्ड एंट्री नाही. पोर्टेबिलिटीच्या निमित्ताने रिझव्र्ह बँक ही टॅपिंग सिस्टीम दूर करण्याचा प्रयत्न करतेय, जेणेकरून देशभरातील वेगवेगळ्या कार्डांसाठी एकच प्रणाली काम करू शकेल.
कार्ड पोर्टेबिलिटीचा फायदा जाणून घेताना काही गोष्टी लक्षात येतात, जसे की ‘व्हिसा’ आणि ‘मास्टरकार्ड’ दोन्ही आपल्याकडे असले तरी, भिन्न नेटवर्क पेमेंट सिस्टम मुळे समोरची नेटवर्क सेवा आपले पेमेंट म्हणजेच कार्ड स्वीकारत नाही. पण आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन प्रणालीनंतर, कोणतेही कार्ड म्हणजेच मास्टर, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस किंवा भारतीय सरकारचे रुपे कार्डने सगळेच नेटवर्क तुमचे पेमेंट स्वीकारतील. कार्ड नेटवर्क पोर्टेबिलिटीमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत असणाऱ्या नेटवर्क कंपन्यांमधील स्पर्धा आता वाढण्याची शक्यता आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे