मुंबई, ७ जानेवारी २०२१: राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्य सरकार तर्फे काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्या बद्दल आपण जाणून घेऊ.६/१/२०२१ तारखेला पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत.
* पुणे जिल्ह्यातील वडगाव-मावळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) ही दोन न्यायालय.
* राज्यातील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतचा गुंठेवारी योजना नियमित करणार. गरीब व सर्वसामान्य लोकांच्या निवार्याची गरज पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.
* मे. विझक्राप्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा.लि मुंबई संस्थेला मायकल जॅक्सन कार्यक्रमसाठीचा करमणूक शुल्क माफिचा निर्णय.
* महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण, २०१६ व फॅब प्रकल्पांकरिता प्रोत्साहनाच्या धोरणात सुधारणा.
* राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार होणार. केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयाबरोबर सांमंजस्य करार करण्यास मान्यता.
* आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत कार्यरत संस्थेमधे दोन आभ्यसक्रमांच्या समावेशास मंजुरी.
* राज्यातील शेतकर्यांना कृषीपंप वीज जोडण्यासाठी सौर उर्जा.
* संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रूग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव