मुंबई, २७ जुलै, २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नुकतीच एकनाथ शिंदे यांनी पोलिस वसाहतीची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीचे निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनेत जागा उपलब्ध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पात्र असलेल्या मात्र भूमिहीन विद्यार्थ्यांना जागा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोणार सरोवर परिसरासाठी ३६९ कोटींचा निधी त्यांनी जाहीर केला आहे.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत त्यांनी १९ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातलेचे हे महत्त्वाचे निर्णय आहेत. यावरुन शिंदे आणि फडणवीसांचे सरकार सक्रीय असून लवकरच अजूनही महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब होईल, हेच यावरुन दिसत आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, हे सांगायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसरले नाही. त्यामुळे तुम्हाला अजून कुठले नवीन निर्णय ऐकायला मिळतील, हे पहाणं गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस