पाकिस्तानमध्ये राष्ट्रिय आणीबाणीची घोषणा; ३० लाख लोक बेघर तर ९३७ जणांचा मृत्यू

लाहोर २७ ऑगस्ट २०२२: पावसामुळे आलेल्या पुरात ३४३ मुलांसह १००० लोकांचे मृत्यू आणि किमान ३ करोड लोक बेघर झाल्यानंतर पाकिस्तानला सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. सिंध प्रांतात १४ जून ते गुरुवार या कालावधीत पुर आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३०६ जणांना त्यांचे जीव गमवावे लागले आहेत.

पाक व्याप्त काशमीरमध्ये आणि गिलगिट भागात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू पावसाळ्यात बलूचिस्थांमध्ये २३४ जणांचा मृत्यू झाला, तर खैबर आणि पंजाब प्रांतात अनुक्रमे १८५ आणि १६५ जणांचा मृत्यू झाला. देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हवामान बदल मंत्री सिनेटर शेरी रहमान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे परदेश दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत. देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहचवण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. ही पर्जन्यवृष्टी भयानक असून पावसामुळे आम्हाला मदतकार्य पोहचवण्यात खास करुन हेलिकॉप्टरने मदत पोहोचवण्यात अडचणी येत असल्याचं रेहमान म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी,सूरज राजेंद्र गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा