अनिल देशमुखांना फरार घोषित करा, मुलांवरही कारवाई करा- किरीट सोमय्या

रत्नागिरी, ४ सप्टेंबर २०२१: अनिल देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. शंभर कोटी वसुली प्रकरणानंतर त्यांचं नाव सातत्याने चर्चेत राहिलं आहे. अनेक वेळा त्यांच्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला तर त्यांच्या वकिलांना देखील सीबीआय ने चौकशीसाठी बोलावलं. भाजपच्या अनेक नेत्यांकडून त्यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात अले. आता किरीट सोमय्या यांनी देखील प्रेस कॉन्फरनसद्वारे अनिल देखमुकांविरोधत वक्त्याव केलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात यावं आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक घोटाळ्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची मागणी केली. अनिल देशमुख प्रकरणात आणखी एक कलाटणी आली आहे. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचं काम करत आहेत. परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. केला नाही दिली. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
मुलांवरही कारवाई करा
अनिल देशमुख यांच्या कंपनीतील घोटाळ्याचा पैसा त्यांच्या मुलांच्या कंपनीत आला आहे. त्याची चौकशी करून देशमुख यांच्या मुलांवरही कारवाई करण्यात यावी. ही आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.
तर यादी वाढणार
सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या यादीतल १२ वा खेळाडू हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांना ही १२ जणांची यादी वाढणार की ही यादी संपली? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री स्वत: घोटाळेबाज आहेत. त्यांनी १९ बंगले बांधले. बायकोच्या नावावर बंगले बांधतात, कुठे गायब करतात माहीत नाही. हे घोटाळे असेच चालू राहिले तर यादी वाढणारच, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा