कोरोना संसर्गातील मृतांच्या संख्येत घट, दैनंदिन १०० पेक्षा कमी

नवी दिल्ली, १५ फेब्रुवरी २०२१: भारतात १ ऑक्टोबर २०२० पासून सातत्याने दैनंदिन मृत्यूची संख्या कमी होत आहे. देशभरात गेल्या ३४ तासात ९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून, भारतात कोविडच्या मृत्यूदरामध्ये विलक्षण घट होत असल्याचे दिसत आहे. आज हा मृत्यू दर १.५ (१.४३ टक्के) पेक्षा कमी आहे. भारतातील रुग्णांचा मृत्यू दर हा जगातील सर्वात कमी मृत्यू दर असलेल्यांपैकी एक आहे.

आतापर्यंत १.०६ कोटी (१,०६,११,७३१) पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात ११,०१६ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा जगातील सर्वाधिक उच्च दर असलेल्या देशांपैकी एक असलेल्या भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७.३१ टक्के इतका आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील फरक काल १,०४,७४,१६४ इतका वाढला आहे.

देशभरात कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्येने १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत, ८२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा