नाशिक मध्ये प्रदूषणात आणि फटाक्यांच्या कचऱ्यात यंदा घट

10

नाशिक, १९ नोव्हेंबर २०२० : नाशिक मध्ये यंदा फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले असले तरी शहरात काही प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी होते त्या मुळे प्रदूषणात आणि फटाक्यांच्या कचऱ्यात यंदा घट झाली आहे.

यंदा फटाक्यांच्या आवाजाची पातळी ५२ ते ६६ डेसीबल इतक्या मर्यादेत असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने दिली. या शिवाय फटाक्यांचे प्रमाण कमी झाल्यानं कचरा देखील कमी झाला. गत वर्षीच्या तुलनेत १९१ मेट्रिक टन कचरा कमी संकलित झाला अशी माहिती नाशिक महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: