मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत होती मोठ्या शहरात तर रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण सापडत होते.मात्र आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.शासनाच्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या उपाययोजना मुळे कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचा राज्यातील दर वाढला असून तो आता 75.36 टक्के एवढा आहे.नागरिकांनी कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यावर घाबरून न जाता तातडीने योग्य उपचार करणे गरजेचे आहे.असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाची संख्या शहराबरोबर ग्रामीण भागात देखील संख्या झपाट्याने वाढत होती.यावर शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना राबवत जेथे गरज आहे अशा गावात लॉकडाऊन करण्यात आले.तर कोरोना संसर्गाची बाधा झाल्यानंतर त्याची लक्षणे कोणती आहेत.किती गंभीरआहेत.पाहुन त्यानुसार पुढचा योग्य वैद्यकीय इलाज करणे , कोरोना संसर्गावर तात्काळ उपचार सुरू केला तर यावर खात्रीशीर मात करता येते.राज्यातील नऊ लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोरोना वर यशस्वीपणे मात केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची 13 लक्षणे सांगितली आहेत.यामध्ये ताप ,थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला ,घसा दुखणे खवखवणे, चव न कळणे ,वास न येणे, थकवा येणे ही कोरोना संसर्गाची लक्षणं आहेत.शासनाने घरोघरी माझा मतदार संघ माझे कुटुंब पद्धती राबवत घरोघरी सर्व्हे करुन प्रत्येक नागरिकांची ऑक्सिजन व टेम्प्रेचर टेस्ट घेतली व संशयित रुग्णांन वर उपचार सुरू केल्याने कोरोना संक्रमणाची साखळी तुटल्याने कोरोना रुग्णांची राज्यातील संख्या कमी करण्यात शासनाला यश आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी -अमोल यादव