समर्पण- आजच्या जगातली खरी सावित्री – सायरा बानो

मुंबई ९ जुलै २०२१- समर्पण म्हणजे स्वत:ला पूर्णपणे एखाद्यासाठी आयुष्यभर समर्पित करणे. याचे मूर्तीमंत डोळ्यासमोरचे उदाहरण म्हणजे अभिनेत्री सायरा बानो. मी ज्याच्यासाठी जगत होते, ते माझं जगण्याचं कारण म्हणजे माझे पती, दिलीपसाहब यांना देवाने माझ्यापासून हिरावून घेतलं. हे उद्गार होते सायरा बानो यांचे. दिलीप कुमार यांच्या शेवटच्या श्वासानंतर हे उद्गार काढून सायराजी यांनी हे दाखवून दिलं की मी दिलीपकुमार यांची सावलीच आहे. १२ वर्षाच्या वयात सायराजी ३४ वर्षीय दिलीपकुमारांच्या प्रेमात पडल्या आणि लग्न करीन तर याच माणसाशी, ही खुणगाठ मनाशी बांधली. त्यानंतर ५४ वर्ष दोघांनी संसार केला. या संसाराच्या वेलीवर कधीच फूल आले नाही. पण अभिनेता शाहरुख खान यांना त्यांनी मुलगा मानलं, तर गान कोकिळा लता मंगेशकर यांना बहिण मानलं. जेव्हा दिलीपकुमरा यांनी सायराबानो ला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्या सुंदर साडी नेसलेल्या होत्या. त्याचक्षणी त्यांची नजर तिच्यावर गेली ती शेवटपर्यंत हललीच नाही. दिलीपकुमार यांचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले. पण शेवटी लग्न गाठ बांधली गेली ती सायराजींशी. शेवटच्या श्वासापर्यंत तिने त्यांची साथ सोडली नाही. ख-या अर्थाने सायाराजी दिलीपकुमारांची सावित्री झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा