राज्यात तुकडेबंदी कायद्या अंतर्गत बंद असलेली दस्त नोंदणी आणि ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांची नोंद लवकरच सुरू होणार

पुणे, ११ ऑक्टोबर २०२२ : संपूर्ण महाराष्ट्रात तुकडे बंदी कायद्या अंतर्गत, बंद असलेली दस्त नोंदणी आणि ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांची नोंदणी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्रालयामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीला महसूल सचिव नितीन कररीकर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रवण हर्डीकर यांच्यासह महसूल व नोंदणी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नोंदणी नियम १९६१ मधील कलम ४४/१ (आय) याला उच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नसल्याचे महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्पर सचिव नितीन करीर यांना याबाबतचे तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे लवकरच दस्त नोंदणीला सुरुवात होईल असा विश्वास दोन्हीही मंत्र्यांनी व्यक्त केला. सामान्य नागरिकांना कायमचा दिलासा देण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचेही महसूल मंत्र्यांनी सांगितले.

पुण्यातच नव्हे तर राज्यभरात तुकडे बंदी कायदा आणि ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांची नोंदणी बंद आहे. यामुळे सदनिका धारकही त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा